ताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री लक्ष्मी नारायण पत संस्थेला विक्रमी २ कोटी ७२ लाख २ हजारांवर निव्वळ नफा व १२२ कोटी ठेवी पुर्ण : सभापती किशोर पोतदार माहिती

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगड (ता कागल) येथील सुवर्णमहोत्सवी श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेला २ कोटी ७२ लाख १ हजार ८३३ रूपयांचा ऐतिहासिक विक्रमी निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्था सभापती किशोर विष्णूपंत पोतदार यांनी दिली.

संस्थेच्या ५९ वर्षाच्या इतिहासात इतका विक्रमी नफा मिळण्याची ही आनंददायी अशी घटना असून, गत वर्षाच्या (२०२३-२४) वर्षाच्या तुलनेत यंदाच्या (२०२४-२५) आर्थिक वर्षात एकूण १९ लाख, २९ हजार ८३९ रूपये इतकी वाढ झाल्याचे” श्री पोतदार यांनी सांगितले.

श्री पोतदार म्हणाले,” संस्थेच्या मुरगूड मुख्यशाखेसह कुर (ता. भुदरगड), सरवडे (ता. राधानगरी), सावर्डे बु (ता कागल), सेनापती कापशी (ता. कागल) व शेळेवाडी ता राधानगरी एकुन ६ शाखा आहेत. या सर्व शाखा अतर्गत एकूण १२२ कोटी ४२ लाख ७२ हजारांवर ठेवी असून, ९० कोटी, ०१ लाख ३१ हजारांवर कर्ज वाटप झाले आहे

ते म्हणाले, ” संस्थेची वार्षिक उलाढाल ४२२ कोटी, ४७ लाख, ८४ हजारांवर आहे तर सस्थेचे खेळते भांडवल १८८ कोटी २७ लाख, इतके विक्रमी झाले आहे. संस्थेकडील ३४१८ सभासदांचे, २ कोटी, ०७ लाख, ६६ हजारांवर भागभांडवल जमा असुन, ६ कोटी, ०४ लाख, ९९ हजारांचा स्वनिधी आणि ४ कोटी, १७ लाख, ५२ हजार राखीव निधी आहे.”

ते म्हणाले,” संस्थेची ५० कोटी, १६ लाख, ११ हजारांची सुरक्षित गुंतवणूक असुन, थकबाकी प्रमाण 0% आहे एन.पी.ए 0% व सी.डी. रेशो ६७.३३ टक्के इतका आहे.

पोतदार म्हणाले, ” संस्थेच्या या ऐतिहासिक दैदिप्यमान यशात संस्था उपसभापती दतात्रय कांबळे, संस्थापक संचालक जवाहर शहा, संचालक सर्व पुंडलीक डाफळे, दत्तात्रय तांबट, अनंत फर्नाडीस, रविंद्र खराडे, चंद्रकांत माळवदे, विनय पोतदार, रविंद्र सणगर जगदीश देशपांडे, सौ. सुनिता शिंदे, श्रीमती भारती कामत, सौ सुजाता सुतार, कार्यकारी संचालक नवनाथ डवरी,सचिव मारूती सणगर शाखाधिकारी सर्व सौ मनिषा सुर्यवंशी (मुरगूड),तुकाराम दाभोळे (सेनापती कापशी),के. डी. पाटील, सरवडे (ता. राधानगरी), रामदास शिऊडकर सावर्डे बु (ता.कागल), बाळासो पाटील कुर (ता. भुदरगड) व राजेंद्र भोसले शेळेवाडी( ता. राधानगरी) यासह सर्व सेवकवृद सभासद ठेवीदार प्रामणिक कर्जदारांचे बहुमोल सहकार्या लाभले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks