ताज्या बातम्या

मलिग्रेत बस्त्याव बारदेस्कर यांचा सत्कार

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

मलिग्रे ता. आजरा येथील महात्मा जोतीबा फुले विद्या मंदिर मलिग्रे या प्राथमिक शाळेचा ध्वजा रोहन कार्यक्रम मलिग्रे ग्रामपंचायत उप सरपंच राजाराम नावलगी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने 15 ऑगस्ट अमृत महोत्सव निमित्त बसत्याॅव बावतीस बार्देसकर यांचा संजय घाटगे यांनी शाल श्रीफळ देवून सत्कार केला .बार्देसकर यांनी मलिग्रे गावामध्ये गेली विस वर्षे श्री रवनाथ दुध संस्था भावेश्वरी पत संस्था प्राथमिक शाळा हायस्कूल व ग्राम पंचायत या ठिकानी विना मोबदला ध्वजा रोहना पुर्वी योग्य पध्दतीने ध्वज बांधण्याचे काम करतात .

26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवसी सकाळीसकाळी पत संस्था दुध संस्था हायस्कूल प्राथमिक शाळा व ग्राम पंचायत या ठिकानी जावून निर्पेक्ष भावनेने झेंडा बांधण्याचे व स्वतंत्र भारत मातेची सेवा करणेचे त्यांचे कार्य पाहून शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच शारदा गुरव पोलिस पाटील मोहन सावंत माझी सरपंच समिर पारदे शाळा समिती अध्यक्ष शिवाजी भगुत्रे मुख्याध्यापिका मनिषा सुतार ग्राम पंचायत सर्व सदस्य विविध संस्थाचे पदाधिकारी ग्रामस्थ हायस्कूल शिक्षक अंगणवाडी सेविका व विद्यार्थी उपस्थित होते आभार कल्पना कोरवी यानी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks