ताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या सभासदांना 11% डिव्हीडंट जाहीर ऑनलाइन सभेत अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची घोषणा.

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या पारदर्शी कारभारमुळे आर्थिक वर्षात 40 लाख 52 हजार इतका विक्रमी नफा झाला असल्याने बँकेच्या सभासदांना 11 टक्के डिव्हिडंड देणार असल्याची घोषणा बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील यांनी ऑनलाइन घेण्यात आलेल्या 74 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.कोरोनामुळे ऑनलाइन घेण्यात आलेल्या सभेत सुमारे चारशे सभासदांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील होते.

वार्षिक साधारण सभेत बोलताना पाटील म्हणाले आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी 57 कोटी 20 लाख झाले असून 38 कोठी 60 हजार कर्जाचे वाटप केले आहे. बँकेचा राखीव निधी 4 कोटी तर शेअर भांडवल 2 कोटी झाले आहेत. कोरोनाचे संकट असूनही बँकेचा एन. पी. ए. 0 टक्क्यावर आहे. बँकेकडे आण्णासाहेब पाटील विकास महामंडळ कर्ज योजना सुरू केली असून आतापर्यंत सुमारे दोन कोटींचे कर्जवाटप केले आहे.

11 टक्के डिव्हिडंड देणारी जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील एकमेव बँक आहे. सभासद,कर्जदार,ठेवीदार यांनी बँकेकडे जास्तीत जास्त व्यवहार वाढवून सहकारी करण्याचे आव्हान श्री पाटील यांनी केले.ऑनलाइन सभेत सहभागी होणाऱ्या सभासदांचे स्वागत अध्यक्ष श्री प्रवीणसिंह पाटील यांनी केले. दीपप्रज्वलन बँकेचे ज्येष्ठ संचालक एकनाथ मांगोरे यांनी केले. अहवाल व सभेचे विषय वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगले यांनी केले. आभार व्हा. चेअरमन वसंतराव शिंदे यांनी मानले.ऑनलाईन सभेत राहुल वंडकर, रणजित भारमल,संजय मोरबाळे, रणजित मगदूम,राजेंद्र आमते, राजू चव्हाण ,सुधीर मोहिते,अनंत घाटगे, अर्जुन मसवेकर,सात्ताप्पा आंगज, आनंदराव कल्याणकर,बटू जाधव यांनी प्रश्न विचारले.

यावेळी व्हा. व्हेअरमन वसंतराव शिंदे, विश्वासराव घाटगे, एकनाथ मांगोरे,नंदकुमार ढेंगे, साताप्पा पाटील, बाळासो पाटील,आनंदा पाटील, संतोष वंडकर,गणपती लोकरे,वासुदेव मेटकर, सच्चिदानंद कुलकर्णी, सुधीर सावर्डेकर,लक्ष्मी जाधव,रेवती सूर्यवंशी, सुजाता पाटील आदी संचालक उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks