ताज्या बातम्यामहाराष्ट्र
सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात 15 मार्चपासून बँकांचा 2 दिवसांचा संप!

टीम ऑनलाईन :
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स च्या बॅनरखाली 9 संघटनांनी सोमवार, 15 मार्चपासून दोन दिवसांच्या बँक संपाची हाक दिली आहे.
दोन सरकारी बँकांच्या प्रस्तावित खासगीकरणाच्या विरोधात संघटनांनी हा संप पुकारला आहे.
गेल्या महिन्यात सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निर्गुंतवणुकीच्या योजनेचा भाग म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (AIBEA) सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी दावा केला की, सुमारे 10 लाख कर्मचारी आणि बँक अधिकारी या संपात सहभागी होतील. 15 आणि 16 मार्च रोजी हा संप असणार असून अनेक बँकांचे कामकाज या कालावधीत ठप्प असणार आहे.
–