बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चंदगड तालुका संमन्वयकपदी कलाप्पा निवगीरे यांची निवड

चंदगड प्रतिनिधी :पुंडलिक सुतार
कलाप्पा मारूती निवगीरे यांची निवड वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,चंदगड तालुका समन्वयक पदी निवड झाली आहे. प्रेरणास्थान वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्ववजी ठाकरे व शिवसेना नेते युवा सेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री. आदित्यजी ठाकरे साहेब याच्यां मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना नेते राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालक मंत्री एकनाथजी शिंदे साहेब ,.खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या चंदगड तालुका समन्वयक पदी निवड झाली. सदरची निवड कक्ष प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुळ संकल्पना तथा निर्माता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष,मंत्रालय मुंबई, मंगेश चिवटे , राम राऊत यांच्या शुभहस्ते देण्यात आले. शिवसेना मदत कक्ष ,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजाभाऊ भिलारे व शिवसेना जिल्हाप्रमुख . विजयदादा देवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कलाप्पा निवगीरे हे शिवसेना प्रणित बांधकाम कामगार सेना चंदगडचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.80% समाजकारण 20% राजकारण हे शिवसेना ब्रीद वाक्य जपत गोरगरीब कामगारांना साहित्य व सुरक्षा किट,अत्यावश्यक सेवा संच स्मार्ट कार्ड वाटप धुनी, भांडी काम करणाऱ्या महिला घरेलू कामगारांना लाभार्थी कार्ड वाटप.कामगारांना मोफत मध्यान भोजन असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोरगरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांना धर्मादाय रूग्णालयात(10%–10%)राखीव खाटा उपलब्ध करुन देणे. निकषांत बसत असलेल्या गरीब रूग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत करणे. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणी असलेल्या रूग्णालयांमध्ये गरजू रूग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर रहावे. गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब– गरजू रूग्णांना भरीव प्रमाणात अर्थ सहाय्य व्हावे याकरिता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री. सिध्दिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळेल राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या ठाणे येथील संपर्क कार्यालयात निवड पत्र देतांना राम राऊत यांच्या हस्ते त्यांना पत्र देण्यात आले