कंथेवाडी येथे जनता दलाकडून वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळा दिवस पाळण्यात आला.

तरसंबळे प्रतिनिधी :
राधानगरी तालुक्यातील कंथेवाडी येथे आज 26 मे रोजी शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असलेल्या निमित्त्याने जनता दलाचे उपाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळा दिवस पाळण्यात आला आहे.
भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला 26 मे रोजी सहा महिने पूर्ण होत आहेत. या निमित्ताने 26 मे रोजी देशभर काळा दिवस साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राधानगरी तालुक्यातील अनेक ठिकाणी जनता दलाच्या वतीने काळा दिवस पाळण्यात येत आहे. कंथेवाडी येथे जनता दलाचे ज्येष्ठ नेते उपाध्यक्ष वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळा दिवस पळून घरासमोर काळे कापड बांधलेल्या गुड्या उभ्या केल्या होत्या. त्याच बरोबर यावेळी शेतकरी विरोधी धोरणांना विरोध करण्यासाठी घोषणाही देण्यात आल्या.