गडहिंग्लज येथे सर्व धर्मियांनी मिळून छत्रपती संभाजीराजे व बसवेश्वर जयंती साधेपणाने केली साजरी

गडहिंग्लज प्रतिनिधी :
सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज आम्ही सर्व नियमांचे पालन करीत शिवबसव व संभाजीराजे जयंती साजरी करून या तिन्ही महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प केला आहे, असे उद्गार श्री राजेंद्र तारळे यांनी काढले.
गडहिंग्लजमध्ये आज शिवबसव व संभाजीराजे यांची जयंती साध्या पद्धतीने सर्वधर्मीयांनी मिळून साजरी केली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
गडहिंग्लजमधील वीरशैव चौकीतील बसवेश्वर महाराज, दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यां तीन्ही प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून गडहिंग्लजकरांनी साधेपणाने ही जयंती साजरी करून सामाजिक ऐक्याची शिकवण दिली आहे.
यावेळी सौ. शोभा जिनेगी यांनी स्वतः तयार केलेल्या मास्कचे वाटपही उपस्थितांना करण्यात आले.
यावेळी सर्वधर्मीय मान्यवर सहभागी झाले होते. या कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र तारळे, दयानंद पाटील, बाळासो वडार, राजशेखरआण्णा, दडी बसवराज जमदाडे, सचिन घोगरे, विश्वास खोत, प्रवीण मेनसे, महादेव मुसळे, बसगोंडा पाटील, कुमार पाटील, प्रकाश कांबळे, महादेव चीनगुडे, शोभा जिनगी, प्रा. लता पालकर आदी सर्व धर्मातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार लता पालकर यांनी मानले.