आजरा येथे युवतीला केले जटामुक्त

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
ग्रामिण भागात उपेक्षित, आडाणी समाजातील अंधश्रद्धा कमी करण्याकरिता त्यांचे प्रबोधन करता येईल , पण शिकलेल्या जनतेचे प्रबोधन करणे फार अवघड काम आहे .पण ते करणे ही महत्वाचे आहे, आजरा येथे बी एस्सी झालेल्या पंचवीस वर्षे वयाच्या युवतीच्या डोक्यात केसांचा गुंता होवून जट तयार झाली.युवतीचे शिक्षण होवून, पुणे सारख्या ठिकाणी नोकरी सुरू आहे. असे असुनही, केवळ समाजाच्या भिती पोटी व भित्रा आणी लाजवट स्वभावा मुळे दडपना खाली होती .ग्रामिण भागातील आई ,वडील हे मुलीच्या जटे मुळे विचारात पडले अशा वेळी मुलीला गावी बोलवून घेतले . डाॅ. डिसोझा मॅडम यांच्या सल्याने महाराष्ट्र अनिस शाखा आजरा येथे गिता पोतदार यांचे वतीने जिल्हाध्यक्ष राजा शिरगुपे , तालुका अध्यक्ष बि के कांबळे, संजय घाटगे, शिवाजी गुरव, काशिनाथ मोरे, प्रतिभा कांबळे , सुप्रिया गुरव यांच्या उपस्थित युवती जटा निर्मुलन करण्यात आले.यावेळी युवती ने अनिशच्या कार्यक्रमात कायमचे सहभागी होण्याचे अश्वासन दिले.