राधानगरी तालुक्यात अवकाळी पावसाचे आगमन

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
राधानगरी तालुक्यात अवकाळी पावसाचे दुसऱ्यांदा आगमन झाले.पावसाने राधानगरी तालुक्यात विजेच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी केले पाडव्यानंतर “गुढी अन पावसाची उडी” अशी म्हण आहे ती प्रचलित आहे ती मात्र खरीच आहे.
आज वातावरणात जास्त प्रमाणात उकाडा जाणवत होता. त्यातच हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवला होता.त्या प्रमाणे खरोखरच पावसाने आगमन केले आहे.उष्णतेने हैराण झालेल्या जनतेला थोडासा थंडावा मिळाला तर शेतातील पिकांची थोडी का असेना काही अंशी तहान भागली आहे.
गुढी पाडव्याच्या आगमन झाले की, येथून पुढे अधून मधून पाऊस पडत असतो.कधी मोठा तर कधी झिमझीम पाऊस पडतो.या पावसा आधी शेतकरी आपली शेतीविषयक कामे पूर्ण करण्यात व्यस्त असतो.महिला वर्ग ही आपली कामे आटोपण्यात व्यस्त असतात.
पावसाने हजेरी लावत राधानगरी तालुक्यातील पिकांना आणि जनतेला गारवा दिला आहे हे मात्र निश्चित.