ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगूड नगरपालिकेच्या मुख्याधिकारपदी हेमंत निकम यांची नियुक्ती

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगूड नगरपालिकेच्या मुख्याधिकारपदी हेमंत आबासाहेब निकम यांची नियुक्ती झाली. शुक्रवारी त्यांनी पदभार स्विकारला. नगरपालिकेच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले .यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार, नामदेवराव मेंडके, सौ. रेखा मांगले, संदीप कलकुटगी, राहुल वंडकर, सुहास खराडे, एम. डी. कांबळे, रविराज परीट, प्रतिभा सुर्यवंशी आदी उपस्थित होते.