ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, शिवाजी विद्यापीठास नॅकचे A++ मानांकन

कोल्हापुर :- रोहन भिऊंगडे

राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेच्यावतीने शिवाजी विद्यापीठास A++ मानांकन आज बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आले. या मुल्यांकनामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानचा तुरा खोवला गेलाआहे.विद्यापीठाचे १५ ते १७ मार्च या कालावधीत नॅकच्या बंगळूरच्या पिअर टीमने मूल्यांकन केले. टीमने संख्यात्मक आणि विश्लेषण या दोन टप्प्यांमध्ये विद्यापीठाचे मुल्यांकन केले. त्यात ७० टक्के संख्यात्मक माहिती व ३० टक्के विश्लेषणात्मक होती. समितीने पाहणीचा अहवाल नॅकला सादर केला. त्यानंतर पुढील प्रक्रिया होऊन विद्यापीठास मुल्यांकन जाहीर करण्यात आले. यात शिवाजी विद्यापीठास ३.५२ सीजीपीएससह A++ मानांकन मिळाले आहे. याबाबतची माहिती समजताच शैक्षणिकसह विविध घटकातील घटकातील मान्यवरांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांना शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांनी दिलेल्या योगदानामुळे हे मानांकन मिळाल्याची भावना कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks