ताज्या बातम्या
फाटकवाडी येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
फाटकवाडी तालुका चंदगड येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष फाटकवाडी गावच्या सरपंच मा. सौ.पूनम फाटक यांचे प्रतिनिधी तुकाराम फाटक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले बहुजन क्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष वॉल्टर नाग साहेब,उपसरपंच विनायक खांडेकर,अमित कांबळे, संदीप दाभिलकर,अमोल कांबळे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिक देशपांडे तसेच श्री खंडोबा मित्र मंडळ फाटकवाडी गावचे सर्व कार्यकर्ते आणि सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. या जयंती निमित्त स्वप्नाली वसंत उंबरे या मुलीने आपल्या भाषणातून अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली.