ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन सुरक्षा विधेयक तातडीने मागे घ्यावे : डावी आघाडी ची मागणी

गडहिंग्लज प्रतिनिधी : राजेंद्र यादव

राज्यातील सरकारने जनतेच्या अभिव्यक्ती व अन्याय विरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक तयार करण्याचं काम या राज्यातील महा युती सरकारने केले असल्याचा आरोप आज डावी आघाडी व गडहिंग्लज तालुक्यातील पुरोगामी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी करण्यात आला व सदरचे विधायक तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. मागणी चे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की ,सरकारचे हे विधेयक शहरी नक्षल वादाचा बीमोड करण्यासाठी आणण्याकरिता आले असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष करण्याऱ्या सर्वच प्रामाणिक व्यक्ती व संघटनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार हे विधेयक आणून करू पाहत आहे. राज्यातील जनतेचे जीवन मरणाचे प्रश्न हे सरकारच्या धोरणामुळे गंभीर बनत चालल्याचे यावेळी बाळेश नाईक यांनी बोलताना सांगितले.

जनतेचे विविध विषय समजावून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करून ते सुरक्षित करणे ऐवजी लोकशाही आंदोलने सरकारकडून मोडून काढण्याचे काम चालू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

राज्य सरकारने लोकशाही विरोधी असलेले विशेष जनसुरक्षा विधेयक विना वलंब मागे घ्यावे ,जाती धर्मांत कलह निर्माण करून स्वार्थी राजकारणासाठी राज्याची सलोखा नष्ट करणाऱ्या व्यक्ती व संघटनांवर कारवाई करण्यात यावी,स्त्रियांवर होणारे अत्याचार, खंडणी, गुंडगिरी करून हत्या करणाऱ्यांवर व त्यांना पाठबळ देणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यात यावी.

इतिहासाची चुकीची मांडणी व छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाई करावी,शेतकरी मजूर कामगार विद्यार्थी महिलांचे ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी योग्य धोरणे आणून त्यांना सुरक्षितता द्यावी आदी मागण्या या निवेदना द्वारे करण्यात आल्या.

यावेळी जनतादल राष्ट्रीय चिटणीस प्रा स्वाती कोरी, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका दिलीप माने,महेश कोरी,मुक्ती संघर्ष समिती राज्याध्यक्ष कॉम्रेड संग्राम सावंत , काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत देसाई ,प्रकाश कुंभार,तानाजी कुऱ्हाडे,रामचंद्र नाईक ,उदय कदम,रावसाहेब पाटील,वसंत नाईक,धोंडिबा कुंभार,सागर पाटील,शिवानंद घस्ती,यांच्यासह डावी आघाडी व पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते हजर होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks