श्री. क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ, कणेरी येथील इम्युनिटी बूस्टर ठरतेय अमृतसंजीवनी; शरीरातील अँटीबॉडीज निर्माण करण्यात महत्वाची भूमिका.

कोल्हापूर :
काही महिन्यांपूर्वी श्री. क्षेत्र सिद्धगिरी महा संस्थान मठ, कणेरी येथून वितरीत करण्यात आलेल्या रोगप्रतिकार शक्ती वर्धक द्रावणाचा चांगला परिणाम कोल्हापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील नागरिकांना झाला आहे.
काही महिन्यांपूर्वी इम्मुनिटी बूस्टर चे वाटप कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाले होते. या द्रावणामध्ये असणाऱ्या अँटीबॉडीज च्या मदतीने कोणत्याही व्हायरसचा परिणाम संपू शकतो, त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी पुन्हा एकदा या रोग प्रतीकर शक्ती वर्धक द्रावणाचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
रोगप्रतिकार शक्ती वर्धक द्रावणासाठी संपर्क : ९२८४२८६८३० / ९४२०५८२८६५
अँटीबॉडी म्हणजे काय?
अँटीबॉडीच्या मदतीनं व्हायरसचा परिणाम संपवू शकतो. अँटीबॉडी शरीरातील असं तत्त्व आहे, ज्याची निर्मिती आपली इम्यून सिस्टिम करतं. खरं तर व्यक्ती जेव्हा कुठल्याही व्हायरसच्या संपर्कात येतो तेव्हा शरीराच्या रक्तात आणि टिश्यूमध्ये असणारी अँटीबॉडी तयार होऊ लागते. या अँटीबॉडीच म्हणजे प्रोटीन्स असतात, जे व्हायरसला शरीरात पसरण्यापासून थांबवतात. कोरोनासोबत लढा देण्यासाठी अँटीबॉडी महत्त्वाची भूमिका निभावतात. मात्र अनेकदा संक्रमणानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होण्यासाठी उशीर लागतो. अँटीबॉडीज बनण्यासाठी एक आठवड्यांचा काळ लागू शकतो. सध्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लोकं अँटीबॉडी टेस्ट करवून घेत आहेत. टेस्टद्वारे आपल्याला माहिती होतं की, शरीर अँटीबॉडीज तयार करू शकत आहे की नाही. शरीरात अँटीबॉडी असेल तर असा निष्कर्ष काढला जातो की, आपण कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेले आहात.
कोरोना व्हायरससोबत कशा लढतात अँटीबॉडी!
जर व्यक्ती कोविड-१९च्या संपर्कात आलेला आसेल तर त्याच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात, ज्या व्हायरससोबत लढतात. अनेकदा त्या बनायला वेळ लागू शकतो. अनेक असे रुग्ण आहेत जे कोरोनामधून बरे झाल्यानंतर एक महिन्यानंतर पण अँटीबॉडी बनवत नाहीत. मात्र कोरोनातून बऱ्या होणाऱ्या १०० पैकी कमीतकमी ७० ते ८० रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात. अनेकांच्या शरीरात बरे झाल्यानंतर एक किंवा दोन आठवड्यांच्या आत अँटीबॉडी तयार होतात. तर कोरोनामुळे बरे झालेल्या ज्या रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी खूप काळानंतर बनतात, अशा रुग्णांच्या प्लाझ्माची गुणवत्ता कमी असल्याचं बोललं जातं. अशा रुग्णांच्या प्लाझ्माचा वापर कमी केला जातो.