अमरेंद्र मिसाळ यांनी सामाजिक बांधीलकी जोपासली – रामचंद्र चौगले

कुडूत्री प्रतिनिधी :
समाजामध्ये स्वार्थी माणसे पावलापावलाला भेटतात. मात्र नि: स्वार्थी माणसे समाजाची सेवा करतात. ज्यांच्याकडे दार्तृत्व, कर्तृत्व, नेर्तृत्व आहे तोच आज समाजशील व्यक्ती होतो. समाजासाठी जन्म आपूला म्हणून प्रामाणिकपणे पदरमोड करतो. यापैकीच पिरळचे युवा नेर्तृत्व अमरेंद्र मिसाळ यांनी शाळेला एल.ई.डी. देऊन सामाजिक बांधीलकी जोपासली असे प्रतिपादन कलाकार रामचंद्र चौगले यानी केले.
अमरेंद्र मिसाळ युवा फौंडेशन पिरळमार्फत कुडूत्री ता. राधानगरी येथील प्राथमिक शाळेत एल.ई.डी टि.व्ही. प्रदान कार्यक्रम आयोजीत कार्यक्रमात रामचंद्र चौगले बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सोनाबाई सुतार होत्या. स्वागत व प्रास्ताविक कवीवर्य मधुकर मुसळे यानी केले.
यावेळी पिरळचे माजी सरपंच व युवा नेते अमरेंद्र मिसाळ यानी वाढदिवसाच्या वारेमाप खर्चाला फाटा देऊन तो पैसा सत्कर्मी लागावा व त्या पैशाचा ऊपयोग होण्यासाठी शाळेतील मुलाना संगणकाचा वापर करण्यासाठीचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन शिष्यवृत्ती, सांकृतिक, क्रिडा व गुणवत्तापूर्ण असलेली कुडूत्री येथील प्राथमीक शाळेला हा एल.ई. डी.देण्यासाठी निवड केली. आणि आपली सामाजीक बांधीलकी जोपासली.
यावेळी मुख्याध्यापक पांडूरंग एरूडकर, अमरेंद्र मिसाळ युवा फौंडेशनचे उपाध्यक्ष निलेश कांबळे यानी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास बलभिम सेवा संस्थेचे संचालक दत्तात्रय चौगले, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा माया चौगले, सदस्य लहु कदम, वैभव सुतार, अध्यापक पी.एन. जाधव, लक्ष्मण गुरव, महादेव कुंभार, अमरेंद्र मिसाळ युवा फौंडेशनचे अध्यक्ष केतन इंजर,खजानिस नितीन कांबळे, प्रकाश कांबळे, पवन इंजर, सचिन कांबळे, सुरज तावडे, तुषार सावेकर, सचिन पाटील विद्यार्थी उपस्थीत होते.