सर्वच गटनेत्यांचे वाढदिवस झाले साजरे… साके येथे कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोर्टस् वेल्फेअर असोशियशन चा वेगळा उपक्रम

व्हनाळी : वार्ताहर
शहरा बरोबरच आता ग्रामीण भागात देखील वाढदिवस म्हटलं ही कार्यकर्त्यांचा गराडा ,फटाके अतषबाजी जेवणावळी, पार्टी या जल्लोषात हा उपक्रम नित्याचाच असतो मग हा वाढदिवस सर्वसामान्यांचा असो की नेत्याचा जल्लोष तर होतोच शिवाय राजकारणातील व्यक्ती चा वाढदिवस असेल तर एकमेकांच्या ईर्षेने साजरे करतात पण या सर्वाला फाटा देत सर्व राजकीय गाव पुढारी गटनेते यांना एका विचाराने एकत्र करून त्यांचा संयुक्त वाढदिवस साजरे करण्याचा उपक्रम जपलाय कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोर्टस् वेल्फेअर असोशियशन यांचे वतीने साके ता.कागल येथे हा वेगळा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. या वेगळ्या उपक्रमाद्वारे एकाच दिवशी गावातील विविध पक्षांचे कार्यकर्ते गटनेते, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, शिक्षक यांचा वाढदिवस साजरा करून एक वेगळाच आदर्श समाजात घालून दिला आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य,व तालुका संघाचे मा.चेअरमन,मुश्रीफ साहेब यांचे गटनेते मा.बाळासाहेब तुरंबे,गव्हर्मेंट कॅांट्रक्टर मा.प्रकाश वाडकर,शेतकरीराजा दुध संस्थेचे चेअरमन ,समरजितसिंह घाटगे गटाचे नेते मा.शहाजी पाटील,भैरवनाथ दुथ संस्थेचे मा.सचिव ,संजयबाबा घाटगे गटाचे नेते मा.बाजीराव चाैगले,माजी सैनिक सी.बी.काबंळे,पत्रकार ,शिक्षक मा.तानाजी पाटील या सहा गटनेत्यांचा संयुक्त वाढदिवसाचा कार्यक्रम भैरवनाथ देवाय येथे विविध मान्यवरांच्या उपस्थीत साजरा करण्यात आला.
यावेळी पत्रकार,रमेश पाटील(सकाळ) ,प्रकाश कांरडे (महाराष्ट्र टाईम्स) ,राजेंद्र काशिद(पुढारी) ,जे.के.कांबळे, (गावमाझा न्यूज) तालुका अध्यक्ष पत्रकार सागर लोहार(तरूण भारत ), अनंतशाती संस्थेचे संस्थापक भगवान गुरव ,अमर निळपणकर,तसेच मान्यवर नानासो कांबळे,चंद्रकांत निऊंगरे,किरण पाटील,मारूती निऊगरे,तानाजी चैागले,अशोक सातुसे,तानाजी हरेल,अशोक पाटील,,बंडोपंत ससे ,संदिप लोहार आदी उपस्थीत होते.