आजरा : कोळिंद्रे येथिल लोकांना तलाठी दाखल्यासाठी होते गैरसोय; स्वतंत्र तलाठी नेमून लोकांची गैरसोय दूर करावी, ग्रामस्थांची मागणी.

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
गेल्या दीड दोन वर्षांपासून कोळिंद्रे,हंदेवाडी,पोश्रातवाडी येथील लोकांना कोणत्याही तलाठी दाखल्यासाठी आजरा येथे जाऊन तलाठी यांची सही घ्यावी लागत असून सदर कामासाठी लोकांना शेतीची कामे सोडून किंवा आपली दिवसभराची मजुरी सोडून
आजऱ्याला जावे लागत असून आजरा येथे जाणेसाठी व येनेसाठी वेळेत वाहतुकीची व्यवस्था नसलेने संपूर्ण दिवस लोकांचे नुकसान होते आहे.
सध्या याठिकाणी असणारे प्रवीण परीट या तलाठ्यांकडे मुख्य चार्ज कीनेचा असून अतिरिक्त चार्ज चाफवडे चा पण असलेने त्यांना कोळिंद्रे या ठिकाणी वेळ देता येत नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
तर कोळिंद्रे येथे स्वतंत्र तलाठी नेमावा व लोकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी निवेदनातून तहसीलदार यांचेकडे पत्रकार पुंडलिक सुतार यांनी केली असून तहसीलदार यांनी आठवड्यातून एक दिवस तलाठी याना हजर राहनेस सांगणार असल्याचे यावेळी सांगितले.