ताज्या बातम्यामहाराष्ट्र
माधवनगर येथे शिवशंभो मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिवशंभो कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ माधवनगर (मुरगुड) येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले . यावेळी मातोश्री ब्लड सेंटर चिकोडीच्या वैद्यकिय पथकाने रक्त संकलन करून घेतले.या शिबिरात मुरगुड ,शिंदेवाडी तसेच माधवनगर येथील युवकांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरास रक्तदात्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरास मंडळाचे सर्व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.