क्रीडाताज्या बातम्या

शिंदेवाडीतील अजिंक्य मोरबाळे च्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद; वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी कडून प्रबंधासाठी आमंत्रण

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागल तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीच्या शिंदेवाडी गावातील अजिंक्य अरूण मोरबाळे यांने अफलातून कामगिरी केली आहे.
अक्षरांचा आणि शब्दांचा गंध नसलेल्या पण केवळ मौखिक बुद्धिमत्तेच्या जोरावर पाठांतराचे नवे शिखर गाठणाऱ्या सहा वर्षीय अजिंक्यच्या पराक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे.

जगातील १९५ देशांच्या राजधान्या अवघ्या पावणेतीन मिनिटात तर २९ सेकंदात भारतातील २९ राज्यांच्या राजधान्या कशाही क्रमाने पाठ असणाऱ्या अजिंक्य च्या उपक्रमाची नोंद घेऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याला सन्मानित केले आहे. अजिंक्यच्या या ग्लोबल विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीने घेतली असून त्याला प्रबंध लिहिण्यासाठी आमंत्रण दिले आहे

सहा महिन्यापूर्वी सर्वसामान्य मुलांसारखाच अजिंक्यचा दिनक्रम. खेळण्या-बागडण्याच्या वयात कोरोना महामारीच्या संकटाचे संधीत रूपांतर करत या चिमुरड्याच्या असामान्य प्रतिभेचा अविष्कार पुरस्काराच्या रूपाने समाजासमोर आला आहे.

मुरगूड शहरालगतच्या शिंदेवाडी गावातील अरुण मोरबाळे यांच्या कुटुंबियांना लॉकडाऊन च्या काळात मोबाईलवर छत्तीसगडच्या एका मुलीच्या व्हिडिओतून प्रेरणा मिळाली. त्यातूनच अजिंक्यच्या बुद्धीमत्तेचा हा नवा प्रवास सुरू झाला. अवघ्या चार महिन्यात अजिंक्य चे चुलते कृष्णात मोरबाळे व आई-वडीलांनी त्याचे पाठांतर करून घेतले. सुरुवातीच्या पाठांतरासाठी त्यास साडेचार मिनिटे लागली.पण लवकरच त्याच्या पाठांतराचा वेग वाढला. त्यातूनच त्याच्या या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने घेतली. आणि प्रत्यक्ष सादरीकरणात अवघ्या पावणे तीन मिनिटात अजिंक्यने १९५ देशाच्या राजधान्या तर हिंदुस्थानातील २९ राज्यांच्या राजधान्या २९ सेकंदात अचूकपणे सादर केल्या. यापूर्वीचे इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधील सर्व विक्रम त्यांने मोडीत काढले.त्यामुळेच त्याच्या नव्या विक्रमाची नोंद इंडिया रेकॉर्डने घेतली .

पहिला सत्कार पत्रकारांच्या हस्ते …..

इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने अजिंक्यचा विक्रमाची नोंद घेत त्याला मानाचे पदक प्रमाणपत्र व पुस्तकाची प्रत पाठवली. मोरबाळे कुटूंबानी या यशात वृत्तपत्र आणि पत्रकारांचा मोठा वाटा असल्याची कृतज्ञता व्यक्त करत अजिंक्य चा पहिला सत्कार मुरगूड शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी व मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे यांच्या हस्ते करविला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks