कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आजरा,चंदगड आणि गडहिंग्लज या तालुक्यांच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपयोजन आणि लसीकरण सदंर्भात ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब व खा. संजय मंडलिक यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.

गडहिंग्लज प्रतिनिधी : सोहेल मकानदार
या तिन्ही तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण तुलनेने कमी असले तरी संभाव्य रुग्ण वाढ लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व उपायोजना तात्काळ उपलब्ध करण्यात येणार आहेत.
ऑक्सीजन बेड, कोविड काळजी केंद्र यांची मे महिन्यापर्यंत स्थानिक पातळीवरच सोय करण्याच्या सूचना यावेळी संबधीत अधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आल्या आहेत.
तसेच, कोरोना रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजनची मागणी दैनंदिनरीत्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवाव्यात सोबतच, गडहिंग्लजच्या पार्श्वभूमीवर आजरा, चंदगड या तालुक्याच्या ठिकाणी देखील ऑक्सीजन प्लांट उभारण्यासंदर्भात तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
वय वर्षे ६० वरील आणि वय वर्षे ४५ ते ६० वयोगातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण लवकरात लवकर करावे तसेच अजून त्याचे लसीकरण झालेले नाही त्यांची वेगळी यादी तयार करून त्यांचे लसीकरण करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी, खा. संजय मंडलिक, उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी संपत खिल्लारे, डी.वाय.एसपी गणेश इंगळे, गडहिंग्लज गट विकास अधिकारी शरद मगर, गडहिंग्लज तहसीलदार दिनेश पारगे, मुख्याधिकारी गडहिंग्लज नागेंद्र मुलगेकर, वैद्यकीय अधिकारी दिलीप अंबोळे, डॉ. अथणी, चंद्रकांत बोडरे, आर.के. खोत, चंदगड तहसीलदार विनोद ननरवेद, चंदगड मुख्याधिकारी अभिजीत जगताप उपस्थित होते.