निवृत्तीनंतर अडगळीतील व्यक्ती न बनता अखेरपर्यंत कार्यरत रहा : प्राचार्य डॉ . अर्जुन कुंभार

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
निवृत्तीनंतर आपण अडगळीतील व्यक्ती न बनता आयुष्याच्या अखेरपर्यंत कार्यरत रहा. कार्यानंद हा अध्यात्मिक आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे.त्यानेच आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होते. असे उद्गार सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूडचे प्राचार्य डॉ.अर्जुन कुंभार यांनी काढले . ते येथील जय शिवराय एज्युकेशन सर्व्ह को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सेवानिवृत्त सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हा चेअरमन संदीप खतकर हे होते .
यावेळी विजयमाला मंडलिक स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती यशोदा सूर्यवंशी, शिवराज ज्युनिअर कॉलेजचे प्रा .एस बी सावंत , शिवाजी रनवरे, धनाजी गोरुले ,अशोक अर्जुने, पांडुरंग कलकुटगी या सभासदांचा सेवानिवृती निमीत उपस्थित मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ व पेहराव देवून सत्कार करणेत आला.
याप्रसंगी एकनाथ आरडे मनिषा साळुंखे , सुरेखा माने, ए.एस् शिंदे, गणेश पुरीबवा , अशोक अर्जुने, साताप्पा कांबळे ,सुरेश सुतार शाखा मॅनेजर यु.बी. पाटील, प्रविण मिसाळ आदींसह सभासद उपस्थित होते .
स्वागत प्रास्ताविक ए एस शिंदे सुत्रसंचलन व्ही बी पाटील तर आभार सातापा कांबळे यांनी मानले .