शिवाजी पेठ येथे वेताळदेव पालखी कार्तिक सोहळा उत्सव भक्तिमय वातावरणात पडला पार

कोल्हापुर :
कोल्हापुर शिवाजी पेठेचे आराध्य ग्रामदैवत श्री वेताळबा वार्षिक पालखी सोहळा कार्यक्रम शनिवार दिनांक 4 नोव्हेंबर 2021 रोजी आनंदात पडला पार . सकाळी नऊ वाजता श्री वेताळ देव अभिषेक विधीवत पूजन झाल्यानंतर दिवसभरात देवाचे कार्यक्रम उत्सव झाले.
संद्याकाळी 09.00 वाजता श्री ची पालखी प्रदक्षिणा वेताळ देव गाभाऱ्यात पुरातन पिंपळाच्या झाडा भोवती पाच प्रदक्षिणा घालून झाली यावेळी भागातील नागरिक भक्त उपस्थित होते. आरती, प्रसाद आणि आतिष बाजी,गुलाल लावून कार्यक्रमा ची सांगता झाली.
यावेळी नगरसेवक अजित राऊत, सागर भाऊ कोराणे, सुजित भाऊ चव्हाण, सौधन अपराध, अमर राऊत, सचिन जाधव, बंडा साठे, विवेक घोरपडे, गणेश जाधव,गोपाळ राऊत, सचिन जाधव, राजू मगदूम, प्रभाकर मगदूम,सुधाकर पाटील, राहुल मगदूम, श्री वेताळ देवाचे पुजारी, आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.