गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना “शाहु” देणार अतिरिक्त खते व औषधांचा डोस नुकसानग्रस्त ऊस उत्पादकांना दिलासा चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांची घोषणा

कागल,प्रतिनिधी .:
कागल तालुक्यात मागील आठवड्यात (ता.२६) रोजी अवकाळी पाऊस व मोठ्या गारपीट मूळे कलिंगड,भेंडी,काकडी आदींसह ऊस क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मोठ्या प्रमाणात फटका कापशी परिसराला बसला . याचबरोबर शेंडूर परिसरातही मोठ्या प्रमाणात ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान अंशतः भरून काढणेच्या दृष्टीने अशा नुकसानग्रस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करखाण्यामार्फत क्रेडीटवर अतिरिक्त रासायनिक खताचा डोस व औषधे पुरविण्यात येणार आहेत. अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्षराजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी श्री घाटगे बुधवारी (ता,२८) रोजी चिकोत्रा खोऱ्यात प्रत्यक्ष बांधावर गेले होते.उपस्थित शासकीय अधिकार्यांना पिकाचे पंचनामे लवकर पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने ताबडतोब मदत द्यावी .अशी आग्रही मागणी केली होती.
यावेळी काही उसउत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर ऊस पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेचे निदर्शनास आणून दिले. त्यावेळी त्यांनी बांधावरच शेती खात्यास अशा नुकसानग्रस्त ऊस पिकांचे पंचनामे करून राबवावयाच्या उपाय योजनांचा अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार तातडीने केलेल्या प्राथमिक सर्वेत,जवळपास एक हजाराहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या गारपीटचा फटका बसला आहे.त्यानुसार लागण हंगाम 2020-21 करीता शाहूकडे नोंद झालेल्या ऊस क्षेत्रास कारखान्यामार्फत वाढीव रासायनिक खत (युरीया) व विद्राव्य खत, बुरशीनाशक औषधाचा सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांना क्रेडीटवर डोस देण्यात येणार आहेत.त्यामध्ये युरिया एक पोते,१९ः१९ः१९ विद्राव्य खत दोन किलो, मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो सागरिका द्रवरूप खत एक लिटर, बाविस्टीन बुरशीनाशक एक नग याप्रमाणे एकरी खते व औषधे यांचा समावेश आहे.ती सर्व उधारीवर व बिनव्याजी पुरवण्यात येणार आहेत त्याची शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची व्याज आकारण्यात करण्यात येणार नसून व्याजाचा भार कारखाना उचलणार आहे. याचा फायदा कापशी सेंटर कडील जैन्याळ नंद्याळ करड्याळ अर्जुनवाडा सह शेंडूर सेंटर कडील दहा गावातील शेतकऱ्यांना होणार आहे.
आठच दिवसात ऊस उत्पादकांसाठी शाहु कारखान्याने घेतलेल्या निर्णयाचे सभासद शेतकऱ्यांतून स्वागत होत आहे.
परंपरा सभासद-शेतकरी यांच्या विकासाभिमुख कारभाराची
कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी सभासद व शेतकरी याना केंद्रस्थानी ठेवूनच कारखाना चालविला. ऊस विकास योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना “शाहू”चा नेहमीच मदतीचा हात मिळत आहे.याशिवाय लोकरी मावा, महापूर अशा आपद्ग्रस्त परिस्थितीत सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम याआधीही शाहूने केले आहे. आत्ता अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या ऊस पिकास अतिरिक्त डोस देऊन या परंपरेत विद्यमान चेअरमन राजेसमरजितसिंह घाटगे यांनी भर घातली आहे.याबाबत शेतकऱ्यांतून त्यांचे कौतुक होत आहे.