ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुडमध्ये नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ८५ जणांवर कारवाई ; १५ हजार ९०० रु. दंड वसूल तर ३ मोटर सायकली जप्त

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्हा लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी मुरगुडात पोलिस स्टेशन आणि नगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून ८२ जणांवर कारवाई करून १५ हजार ९०० रु. दंड आणि ३ मोटर सायकली जप्त करण्यात आल्या.
मास्क नसलेल्या ५५ जणांकडून ५ हजार ५०० रु. दंड, ६ जणांवर अस्थापणा कार्यवाही करुन ३ हजार ५०० रु. दंड, मॉर्निग वॉक करणाऱ्या ९ जणांकडून ४ हजार ५०० रु. दंड तर १२ मोटारसायकलस्वारांकडून २ हजार ४०० रु. दंड करण्यात आला. ३ जणांच्या मोटर सायकली जप्त केल्या. शहराच्या सर्व सीमा लॉकडाऊन संपेपर्यंत बंद असणार आहेत. सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर कुमार खाडे, कुमार ढेरे यांच्यासह ३०पोलीस कर्मचारी, ३० होमगार्ड असा फौजफाटा कारवाईसाठी २४ तास सज्ज ठेवण्यात आला आहे.