ताज्या बातम्यामहाराष्ट्र

फोंडयाहून कोल्हापूर च्या दिशेने जात असताना फोंडाघाटात होंडा अमेझ कारला अपघात ; पति – पत्नी जखमी

फोंडा:

फोंडाघाटात चालकाचा ताबा सुटून होंडा अमेझ कार घाटात कोसळून झालेल्या अपघातात पती -पत्नी जखमी झाले असून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोल्हापूर येथील प्रदीप कारडोने आपल्या ताब्यातील होंडा अमेझ कार ( MH-09 , FS – 0560 ) घेऊन फोंडयाहून कोल्हापूर च्या दिशेने जात होते. कारमध्ये प्रदीप यांच्यासोबत त्यांची पत्नी स्वाती होती.फोंडाघाटात भालेकर यांच्या हॉटेलच्या पुढे सुमारे दीड की.मी.अंतरावर वळणाचा अंदाज न आल्याने कार रस्त्यापासून 10 फूट खाली कोसळली. सुदैवाने कार झाडाला अडकली. तसेच गाडीतील एअर बॅग्ज फुटल्यामुळे कारडोने दाम्पत्याला विशेष दुखापत झाली नाही. अन्यथा अनर्थ घडला असता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अलंकार रावराणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, चालक ए एस आय राजू उबाळे, राहुल तळसकर, फोंडाघाट आउटपोस्ट चे हवालदार उत्तम वंजारी, राऊळ यांनी घटनास्थळी जात अपघातग्रस्त जखमी कारडोने दाम्पत्याला कारमधून बाहेर काढले. पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनीही घटनास्थळी जात अपघाताची पाहणी केली. जखमींना फोंडाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान या अपघातात चालक आणि सहप्रवासी यांनी सीटबेल्ट बांधलेले होते म्हणून एअरबॅग्ज फुटून मोठी जखम झाली नाही. अन्यथा अपघाताची भीषणता पाहता अनर्थ घडला असता. त्यामुळे कारचालक आणि सहप्रवाशानी कारमधून प्रवास करताना कायम सीटबेल्ट बांधावा असे आवाहन कणकवली पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांनी केले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks