कोविड बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी ‘आप’ने सुरु केली हेल्पलाईन; ‘आप’चा हेल्पलाईन नंबर 7718812200

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर जिल्हात कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. एखादी व्यक्ती कोरोना बाधित झाल्यानंतर भितीपोटी पहिल्यांदा गोंधळून जाते, त्याला किंवा त्याच्या नातेवाइकांना नेमके काय करुया, हॉस्पिटलला जावुया की कोविड केअर सेंटरला जावुया, या बाबत योग्य निर्णय घेता येत नाहीत व त्यानां उपयुक्त सेवा कोठे उपलब्ध होवू शकते याचीही माहिती नसते.
अश्यावेळी त्याना मदत करण्याच्या हेतूने आम आदमी पार्टी कोल्हापुरच्यावतीने कोरोना हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. यामधे, ‘आप’च्या 7718812200 या हेल्पलाईन नंबरवर फ़ोन आल्यानंतर रुग्णांची सध्यस्थिती समजून घेवुन त्यांना,
1) ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड, आयसियू बेड कुठे उपलब्ध होवू शकेल याची माहिती देणे
2) आपल्या जवळच्या कोविड केअर सेंटरची माहिती व बेडची उपलब्धता याची माहिती देणे
3) ऑक्सिजन कुठे उपलब्ध होवू शकेल याची माहिती देणे
4) ambulance उपलब्ध करुन देणे, अम्बुलंस उपलब्ध न झाल्यास रिक्षाची सोय उपलब्ध करुन देणे
5) प्लाझमा उपलब्धते बाबात माहिती देणे
अश्याप्रकारे मदत केली जाणार आहे.
तरी आपल्या संबंधित कोणीही व्यक्ती कोविड बाधित झाला असल्यास व त्याला काही मदत हवी अस्ल्यास ‘आप’च्या 7718812200 या हेल्पलाईन नम्बर वर संपर्क करावा. अथवा महापालिका/जिल्हाधिकारी कार्यलय कोविड माहिती केंद्रात फ़ोन करुन, व्यवस्थीत माहिती घेवुन, गोंधळून न जाता निर्णय घावा.
आपण मिळुन कोरोनाच्या मुकाबला करू, आणि कोरोनाला हरवू