दक्षिण चे लोकप्रिय आमदार मा. ऋतुराज पाटील (दादा) यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नितिन मगदुम व अमर मगदुम यांच्या कडुन पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान

रोहन भिऊंगडे /कोल्हापुर :-
मगदुम अँन्ड सन्स रीगंरोड यांच्या वतीने 10000/- दहा हजार शेणी स्मशानभूमीस शेणी दान..
सध्या कोल्हापूर शहरातील हॉस्पिटल मध्ये तसेच कोविड सेंटर मध्ये दुर्दैवाने मरण पावलेल्या रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये संपूर्ण जिल्हा तसेच बाहेरील रुग्णाचे मृतदेह सुद्धा असतात. कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्यादा शेणी लागतात. या शेणी विकत घ्यायचे म्हटले तरीसुद्धा जे शेणी पुरवठादार आहेत त्यांच्याकडून त्या प्रमाणात शेणी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. हीच उणिव लक्षात घेऊन
मा.नितीन मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचगंगा घाट स्मशानभूमीचे मुकादम श्री. अरविंद कांबळे यांच्या कडे पाच हजार शेनी सुपूर्द करुन सामाजिक बांधिलकी जपुन शेनी दान करण्यात आले.

या प्रसंगी मा.अमर मगदुम नितीन मगदुम ,अनिल ढेरे ,विनय भोसले, आभिजीत देसाई, अमोल चोपडे, सागर देवकर, गोपी गडकरी, आणि मगदुम मित्र परिवार उपस्थित होते.