करोनाच्या लढाईत आम आदमीचाही सहाभाग गेल्या 8 दिवसात आम आदमी रिक्षा चालक संघटनेने केल्या 1000 रिक्षाचे निर्जंतुकीकरण

रोहन भिऊंगडे/
कोल्हापुर :-
शहरात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीत सेवा देणाऱ्या रिक्षा चालकांच्या व रिक्षा मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना करोनाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे. ही बाब लक्षात घेवुन, कोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने मोफत रिक्षा सेनिटाइजशन (निर्जंतुकीकरण) मोहीम दी. 19 एप्रिल रोजी कोल्हापुरात सुरु करण्यात आली.
रिक्षाचालकांचा आत्मविश्वास व सुरक्षितता वाढवण्याच्या उद्देशाने आम आदमी रिक्षा चालक संघटनेच्या पदाधिकार्यानी
शहरातील रिक्षा थांब्याचा नियोजनपुर्ण एक रुट तयार केला. त्यामुसार रोज सकाळी 10 वाजता 5/6 पदधिकार्याची एक टीम रिक्षा थांब्यावर जावुन, रिक्षा चालकांना सेनिटाइजेशनचे महत्त्व सागुंन त्यांच्या रिक्षा मोफत सेनिटाइज़ करुन देतात. सकाळी सुरु केलेले हे काम दुपारी साधारणपणे 3/4 वाजेपर्यंत न थकता चालूच असते. या रुट दरम्यान एखादे सरकारी कार्यालय, पोलीस सटेशन, असल्यास तेही सेनिटाइज़ केले जाते. गेले 8 दिवस ही मोहीम सुरु असुन, जवळपास 1000 रिक्षांचे सेनिटाइजेशन झाले आहे.
शहरातील सर्व रिक्षा थांबे झाल्याशिवाय न थांबण्याचा निर्धार आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकार्यानी केला आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता अध्यक्ष राकेश गायकवाड, संघटक विजय भोसले, उपाध्यक्ष प्रकाश हरने, खजिनदार महेश घोलपे, सचिव बाबुराव बाजारी, कार्याध्यक्ष लाला बिरजे, सुभाष भांडवले, संभाजी देसाई, मंगेश मोहिते, राम गावडे, यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमामधे आज पर्यंत सेनिटाइज़ केलेल्या रिक्षा थांब्याची यादी.
दिनांक- 19.4.21
ठिकाण- सेंट्रल बस स्टँड़, दाभोलकर सिग्नल, तावडे हॉटल, महाडिक वसाहत, महाराजा होटेल, दत्त मंदीर, डी.वाय. पाटिल हॉस्पिटल-कदमवाडी, एपल हॉस्पिटल-भोसलेवाडी, बावडा, लाईन बझार, सर्किट हाऊस, नागाळा पार्क कमान, कलेक्टर ऑफ़िस,
दिनांक- 20.4.21
ठिकाण- बोंन्द्रे नगर चौक, फुलेवाडी, अयोध्या कॉलनी, लक्ष तिर्थ वसाहत, अंबाई टैंक, डी मार्ट, रंकळा टॉवर, रंकळा स्टँड़, गंगावेश, पापाची तिकटी.
दिनांक- 21.4.21
ठिकाण- आपटेनगर , सानेगुरूजी तलवार चौक ,देवकर पाणंद ,राजकपूर पुतळा,राजाराम चौक, 8 नं शाळा, खंडोबा तालीम, उभा मारूती चौक, निवृत्ती चौक,
बिनखांबी गणेश मंदीर,कपिल मार्केट,
घाटी दरवाजा, शिवाजी चौक,माळकर चौक, बिंदू चौक.
दिनांक- 22.4.21
ठिकाण- बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, मराठा बाॅक,शनिवार पोस्ट ऑफिस, करवीर पोलीस टेन्शन, सी.पी.आर.चौक, टाऊन हाॅल, दसरा चौक, शारदा कॅफे चौक
दिनांक- 23.4.21
ठिकाण- कळंबा, साई मंदीर रिक्षा स्टॉप, रायगड काॅलनी, I.T.I.रिक्षा स्टॉप, जोशी नगर, संभाजीनगर स्टॉप,
रेसकोर्स नाका,शाहू बाॅक, कोळेकर तिकीट,शिंगोशी मार्केट, मिरजकर तिकटी,शाहू मैदान.
दिनांक- 24.4.21
ठिकाण- आझाद चौक, सविञीबाई हाॅस्पिटल, उदमनगर, शाहूपूरी, गोकुळा हाॅटेल, बसत बहार टाॅकी,कलेक्टर ऑफिस, महावीर काॅलेज,बावडा पोष्ट ऑफिस, पितळी गणपती, डी मार्ट,
दिनांक- 25.4.21
ठिकाण- वाय पी पोवार नगर,चांनी चौक, यादव नगर,बाईचा पूतळा ,सायबर चौक,राजाराम पूरी पोलीस स्टेशन, पूर्ण राजाराम पूरी,बागल चौक,बी टी काॅलेज,मौलिक मडंलिक पार्क, दीपा गॅस.
दिनांक- 26.4.21
ठिकाण- रेल्वे फाटक ,लाॅ काॅलेज, टाकाळा चौक,माळे काॅलनी, टेबलाई नाका,टेबलाई मंदीर, विक्रम नगर सर्व,उचगाव ,लोणार वसाहत,मार्केट यार्ड पाठीमागील बाजूस,स्टार बाजार, सयाजी हाॅटेल, शिवाजी पार्क, विक्रम हायस्कूल.
आम आदमी पार्टी रिक्षा चालक संघटनेच्या या उपक्रामास शहरातील सर्वच रिक्षा चालकानी उस्फूर्त प्रतिसाद दिला असुन. या ऊपक्रमाचे समाजातील सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे..