ताज्या बातम्या
‘त्या’ आजीची घरी वाट पाहत आहेत.. मुळ गावी कोण सोडतील काय हो???

आजरा प्रतिनिधी /पुंडलिक सुतार.
गेल्या काही दिवसापासून आजरा एस टी स्टॅन्ड वर ही आजी मुक्कामाला असेलचे स्थानिक लोकांच्या निदर्शनास आले. बहुतेक सावंतवाडी कडे जाण्यासाठी बस मिळत नसलेने आजीबाई स्टॅन्ड वर मुक्कामाला आहे. तसेच लॉकडाउन लागलेने आजीला प्रवासाची सोय झाली नसण्याची शक्यता आहे.
एस टी अधिकारी , तहसीलदार प्रशासन किंवा नगर पंचायत प्रशासन या पैकी कोणीही ‘त्या ‘ आजीबाईला आपल्या मूळगावी सोडणेची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक लोकांच्या कडून सातत्याने होत आहे.