मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत असणारा कोल्हापूरचा युवक चि. पियुष संजय वणकुद्रे याने जपली सामाजिक बांधलकी.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर शहरातील सत्याई नगर रिंग रोड येथे राहणारा मध्यमवर्गीय युवक चि. पियुष संजय वणकुद्रे हा गेली चार वर्षे मर्चंट नेव्ही मध्ये कार्यरत आहे. गेल्या चार वर्षात नोकरी निमित्य जगभर फिरत असताना त्याला कुठेही त्याचा वाढदिवस साजरा करण्याची संधी उपलब्ध झाली नाही. पण यंदाच्या वर्षी तो सुट्टीनिमित्त येथे आला असताना आपला 23 वा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा न करता अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपले सामाजिक बांधिलकीचे भान जपत अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसासाठी होणाऱ्या खर्चातून त्याने येथील रीगंरोड परिसरात मध्ये कोव्हीड 19 च्या भिषण परिस्थिति मध्ये आपला जिव धोक्यात घालुन कार्य करण्यार्या नर्स व आरोग्यसेविकाना आवश्यक त्या वस्तूं, मास्क आणि सनँटायझर भेट देऊन करून आपली सामाजिक बांधिलकी जपली. तसेच आपल्या पाहुणे पै मित्र मंडळीना सुद्धा तो मास्क भेट देऊन साजरा केला.
या युवकांचे समाजामधुन कौतुक होत आहे.या मध्ये त्याला त्याचे वडील संजय वणकुद्रे,आई अनुराधा वणकुद्रे, आजी श्रीमती विजया वणकुद्रे व श्रीमती.मालती वाडकर यांची नेहमीच भक्कम साथ लाभते.