क!! तारळेत राधानगरी पोलिसांकडून कडक कारवाई; कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांनी घेतला चांगलाच धसका

कुडूत्री प्रतिनिधी :
क!!तारळे येथे राधानगरी येथे कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या व विनाकारण टू व्हीलर वरून विनामास्क तसेच वेळेचे तारतम्य न बाळगणाऱ्या दुकानदार यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.त्यामुळे इतरत्र व विनाकारण फिरणाऱ्यांनी राधानगरी पोलिसांच्या या कडक कारवाईचा चांगलाच धसका घेतला.
आज शुक्रवार सायंकाळी ५.०० वा राधानगरी पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील मॅडम यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी कडक कारवाई केली.
कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या व विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे या कारवाईचा सर्वांनी चांगलाच धसका घेतला.या कारवाईत अनुराधा पाटील मॅडम,पोलीस नाईक कृष्णात यादव, अजित गेंगजे,यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
नियम पाळण्याच्या सूचना…
कारवाई करत असताना सर्वांना कोरोनाचे नियम पाळण्याच्या सक्त सूचना पोलीस उपनिरीकक्ष अनुराधा पाटील मॅडम यांच्याकडून करण्यात येत होत्या.