गारगोटी च्या बारदेसकर शिक्षण संकुलामध्ये गरीब रूग्णांसाठी ५० बेडचे अदयावत कोव्हीड केअर सेंटर सूरू करणार : देवराज बारदेसकर

गारगोटी प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता गारगोटी येथील मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी मार्फत गारगोटी येथील शिक्षण संकुलामध्ये ५० बेड चे अद्यायावत कोव्हीड केअर सेंटर उभारणीचे काम हाती घेतले असून १३ मे २०२१ पासून हे कोव्हीड केअर सेंटर सुरू करून गरजु रूग्णांना त्याचा लाभ दिला जाईल अशी माहिती गारगोटी च्या मनवेल बारदेस्कर शिक्षण संकुलाचे अध्यक्ष देवराज बारदेसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत याबध्दल अधिक माहिती देताना देवराज बारदेसकर म्हणाले की,”या कोव्हीड केअर सेंटर मध्ये दारिद्ररेषेखालील रूग्णांना हॉस्पिटल बेडची सुविधा मोफत दिली जाईल.तसेच इतर गरीब रुग्णांनाही उपचाराच्या बिलामध्ये सवलत दिली जाईल.या कोव्हीड केअर सेंटर मध्ये २५ ऑक्सजिन बेड उपलब्ध असतील.”
यासंदर्भात अधिक माहिती देताना देवराज बारदेसकर पुढे म्हणाले की,” यापुर्वी या आमच्या संस्थेने कोरोना काळामध्ये गरीब गरजू वीटभट्टी कामगार , ऊसतोडणी कामगार , बांधकाम कामगार , परराज्यातुन आलेले मजुर , लमाणी कामगार यांना व लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या लोकांना मोफत रेशन धान्य कीट व कोव्हीड बचावाकरीता सुरक्षा कीट वाटप केले . कोरोना काळात संस्थेच्या नर्सिग महाविदयालयामार्फत घर टू घर सर्वे करून लोकांची आरोग्य तपासणी व कोव्हीड पासुन बचावाकरीता समुपदेशन करणेत आले.तसेच संस्थेची इमारत बाहेरून आलेल्या व संशयित लोकांना क्वारंटाईन करणेकरीता प्रशासनास उपलब्ध करून देणेत आली.५००० क्वारंटाईन लोकांना संस्थेमार्फत मोफत जेवण पाकीट पुरवणेत आले . रोगप्रतिकार शक्तीवर्धक अर्सेनिक अल्बम या गोळयांचे २२ हजार लोकांना मोफत वाटप करणेत आले . गारगोटी येथील कोव्हीड केअर सेंटर मध्ये प्रशासनास गेले वर्षभर स्वँब संकलन ,नर्सिंग स्टाफ , कौन्सलिंग स्टाफ संस्था खर्चातुन पुरवला जात आहे . तसेच कोव्हीड काळात काम केलेल्या व्यक्तींना “कोव्हीड योध्दा ” प्रमाणपत्राने सन्मानित करणेत आले .” ते पुढे म्हणाले की, गारगोटीच्या या मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी मार्फत कोव्हीड काळामध्ये प्रशासनास शक्य तेवढी मदत करणेस आम्ही सदैव तयार आहोत.कोरोनामुक्तीसाठी आमची ही संस्था शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहील.