ताज्या बातम्यामहाराष्ट्र
निढोरी परिसरात गव्यांचा कळप ; शेतकरी वर्गात भितीचे वातावरण

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगुड येथील वेदगंगा नदीकाठावरून चार गवारेड्यांचा कळप दुपारी जाताना अनेक नागरिकांनी पाहिला. त्यामुळे शेतकरी वर्गात यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. आज दुपारी वाघापूरकडून बाग नावाच्या शेताकडून येणारा गवारेड्यांचा कळप लोकांनी पाहिला. हा कळप जिल्हा परिषदेच्या स्टोअर रुमकडून गावाच्या दिशेने येताना एक गवा रेडा हनुमान दूधसंस्थेच्या इमारतीकडे गेल्यामुळे कळपातील अन्य गव्यानीही साखरे महाराज आश्रमाच्या बाजूने कुरणीच्या दिशेने धुम ठोकली.