सरपिराजीराव तलावाच्या सांडव्या वरती पुल व्हावा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुरगूड शहरवासीयांतर्फे निवेदन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड शहराच्या पूर्व बाजूस सर पिराजीराव तलाव हा शंभर वर्ष पूर्ण झालेल्या तलाव आहे पावसाळ्यात मुरगूड शहरास पाण्याचा वेढा पडतो.यावेळी या ठिकाणी असणाऱ्या तलाव पूर्ण भरला की सांडव्यावरून पाणी रस्त्यावर येते या ठिकाणी पूल झाल्यास शहराबाहेर जाण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली होईल शहरामध्ये महापूर काळात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हाच एक मार्ग सुरू झाल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळेल तसेच बरेच दिवस पाणी साचून राहते व शेवाळ निर्माण होते.या शेवाळावरुन अनेक दुचाकीस्वार घसरून पडले आहेत.
त्यांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत मुरगूड मधील सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेवाळ काढून टाकण्याचे काम दरवर्षी केले जात आहे हा रस्ता मुरगूड कापशी गडहिंग्लज तसेच बेनिक्रे मार्गे निपाणी या गावांना जोडणारा रहदारीच व वाहतुकीचा आहे. ऊसाचे ट्रॅक्टर , ट्रक अशा अवजड वाहनांची वाहतूक सुद्धा या रस्त्यावरून सर्रास होत असते त्यामुळे सांडव्यावर पूल करण्यात यावा अशी मागणी शहरवासीय अनेक वर्ष करत आहेत.
यासाठी शासनाने लक्ष घालून या दोन्ही मागणी पूर्णत्वाकडे न्यावेत यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना शहरवासीयंतर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, ओंकार पोतदार,तानाजी भराडे,आनंदा रामाने, शिवाजी चौगले,धनंजय सूर्यवंशी,प्रफुल कांबळे,अमर सुतार,जगदीश गुरव,संकेत शहा, संकेत भोसले यांच्यासह शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.