शिवाजी विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघाची निवड ; राज्य आंतरविद्यापीठ क्रीडामहोत्सव स्पर्धेत सहभागी होणार

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आयोजित 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडामहोत्सव
स्पर्धा चंद्रपूर येथील शिवाजी महाराज विद्यापीठात
होत आहेत . या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या १२ खेळाडूंची निवड झाली असून हा संघ या स्पर्धेत सहभागी होत असल्याची माहिती निवड समिती चेअरमन प्रा. सुनील चव्हाण यांनी दिली आहे .
शिवाजी विद्यापीठाच्या या संघात ओंकार लोकरे , गजानन गोधडे , कृपेश पाटील , अमन नायकवडी , हर्षद कांदळकर, अभिजीत कांबळे , गिरीश खामकर , धीरज पाटील , धैर्यशील खोत , पियुष जांभळे , देवेंद्र कोळगे , सौरभ गदाळे यांचा समावेश आहे . निवड समितीचे चेअरमन प्रा. सुनील चव्हाण (कुरुंदवाड ) ,प्रा. संदीप पाटील ( इस्लामपूर ) व प्रा. एन डी पाटील ( बिद्री ) यांच्या समितीने केली आहे . तसेच या संघाची प्रशिक्षकाची जबाबदारी प्रा. सुनिल चव्हाण सांभाळत आहेत .