ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण

नवी दिल्ली :

मागच्या एक महिन्यांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण होत असताना दिसत आहे. होळी सणाच्या निमित्ताने ग्राहकांना सोने खरेदी करण्याची चांगली संधी मिळत आहे. मार्च महिन्यात जवळ जवळ १८०० रुपयांपर्यंत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान सोन्याच्या दर ४५ हजारांच्या आत आला आहे. या आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार बंद होताना १४७ रुपयांनी सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचा आजचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४४,०८१ रुपये इतका झाला आहे.

मार्च महिन्याच्या सुरूवातीला २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५ हजार ९२० रुपये इतका होता. दरम्यान मागच्या काही दिवसांत चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. एप्रिलचा बाजार सुरू होण्यापुर्वी एमसीएक्सवर ६४ रुपयांची घसरण होताना दिसून आली. चांदी प्रति किलोला आजचा भाव ६४८०५ रूपये इतका आहे.

दरम्यान आठवड्याच्या सुरूवातीला एमसीएक्सवर ६७ हजार रुपये प्रतिकिलो चांदीचा दर खुला झाला. तर आठवड्याच्या शेवटी २७२२ रुपयांनी घसरत ६५ हजारांच्या घरात आला. याचबरोबर सोन्याच्या भाव मार्च या एका महिन्यात १८०० रुपयांनी घसरला आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks