ताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक! बायकोला कार शिकवू लागला, गाडी थेट विहिरीत, पत्नी, नवरा, मुलगी…

पत्नीला कार शिकवताना पती, पत्नी आणि मुलगी हे तिघांचाही दुर्दैवी अपघात झाल्याची विचित्र घटना घडली आहे.

बुलढाणाः 

बुलढाण्यात (Buldhana) एक गंभीर घटना घडली आहे. पत्नीला कार (Car learning) शिकवायला गेलेल्या एकाची कार थेट विहिरीतच जाऊन कोसळली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या कारमध्ये पती, पत्नी आणि मुलगी असे तिघेही होते. मात्र अचानक कार रेस झाली आणि नियंत्रण सुटल्यामुळे ती थेट विहिरीत (Car fell into river) कोसळली.

या घटनेत पत्नी आणि मुलीचा बुडून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काय विहिरीत कोसळल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी तत्काळ या कुटुंबाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले.

घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी जमली. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील कुंभारीची घटना आहे. विहिरीत पडलेल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासनातर्फे प्रयत्न सुरु आहेत.

सद्य स्थितीत एका क्रेनच्या मदतीने पतीला बाहेर काढण्यात आले आहे. नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मात्र पत्नी आणि मुलीचा अद्याप शोध लागलेला नाही.

कुंभारी येथे सदर विहिरीभोवती नागरिकांची प्रचंड गर्दी जमली आहे. उर्वरीत दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks