गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र
सोनाळी खून प्रकरण : मारुती वैद्यला आणखीन २ दिवसांची कोठडी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनाळी येथील सात वर्षांच्या वरदच्या खून प्रकरणी संशयित आरोपी दत्तात्रय ऊर्फ मारुती तुकाराम वैद्य यास मुरगूड पोलिसांनी कागलच्या न्यायालयात बुधवारी हजर केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विजया काटकर यांनी त्यास आणखीन २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. यापूर्वी पाच आणि सात दिवस अशी १२ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. न्यायालयात करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील, मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे उपस्थित होते.