मुरगूड येथे कोचींगच्या दुकानास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड येथील निपाणी रोडवरील महालक्ष्मीनगर जवळील रामदास वंजारे यांच्या कोचिंग अॅन्ड कूषण वर्क या दुकानात आज सकाळी अचानक आग लागल्याने दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. कुलूप बंद अवस्थेतील दुकानाच्या वरील जाळीतून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले आणि पाहता पाहता आगीच्या ज्वालांनी रौद्र रूप धारण केले.
दुकान मालक रामदास वंजारे यांची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून त्यांनी कर्ज काढून दुकानांमध्ये साहित्य भरले होते. आता दुकानांमध्ये आग लागून साहित्याची राख रांगोळी झाली
असून त्याचे लाखो रुपायचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे मुरगूड येथे शॉर्टसर्किटमुळे कोचींगच्या दुकानास आग लागून पाच लाखाचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत गाड्यांचे सीट, कोचिंग टप, रूपकाम, तसेच घरगुती सोपा सेटचे कोचिंग काम येथे करुन दिले जात होते. त्यामूळे दुकानातील लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाले.
आगीचे लोट पाहून परिसरातील लोकांनी एकत्र येत आग विझवण्याचा प्रदान केला याचवेळी मुरगूड नगरपरिषद अग्रिशमन बंब व बिद्री साखर कारखाना अनीशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.पण दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते .या गोष्टीबद्दल हळहळ व्यक्त होत होती.रामदासच्या मित्र मंडळींकडून सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.