यशस्वी उघोजक व सक्षम महिला बनवण्यासाठी ‘ माऊली ‘ सदैव कटिबद्ध : सौ.अमरिन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; फराकटेवाडीत प्रशिक्षण शिबीर संपन्न

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके
माऊली महिला विकास संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळून त्यांना यशस्वी उघोजक व सक्षम महिला बनवण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन माऊली महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ.अमरिन नविद मुश्रीफ यांनी केले.
फराकटेवाडी ( ता. कागल ) येथील माऊली महिला विकास सेवा संस्था व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खाद्यपदार्थ प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा व सरपंच सौ.शितल फराकटे होत्या.
यावेळी शितल फराकटे म्हणाल्या, महिलांनी चूल-मुल यामध्ये न गुंतता बदलत्या काळानुसार नवीन वाटा शोधाण्याचा प्रयत्न करावा. माऊली संस्थेने महिलांसाठी अशी संधी उपलब्ध करुन दिली असून खाद्य महोत्सव हे एक प्रकाराचे व्यासपीठ त्यांना मिळाले आहे. याचा फायदा घेऊन महिलांनी घर बसल्या स्वतःचा व्यवसाय करावा.
यावेळी मुख्य प्रशिक्षिका सौ. गंधाली दिंडे यांनी उपस्थित युवती व महिलांना विविध खाद्यपदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले. यावेळी तेजस्विनी फराकटे, प्रियांका फराकटे, आशा फराकटे, सर्वेश्वरी फराकटे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रशिक्षणाच्या समारोपाला महिलांनी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद उपस्थित महिला व मान्यवरांनी घेतला.
कार्यक्रमास ग्रा.पं. सदस्या कोमल फराकटे, अश्विनी फराकटे, तेजस्विनी फराकटे, श्रीमाबाई फराकटे, मंगल फराकटे, अलका फराकटे यांच्यासह युवती व महिला उपस्थित होत्या. आभार मंगल फराकटे यांनी मानले.