मुरगुड मधील गणेश नागरी पतसंस्थेला २ कोटी १ लाखावर नफा , वार्षिक उलाढाल ५५३ कोटीवर ; २ कोटीवर नफा मिळवणारी जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड (ता. कागल ) येथील ३४ वर्षाच्या श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेस आर्थिक वर्षात २ कोटी १ लाख रुपये इतका नफा झाला असुन वार्षिक उलाढाल विक्रमी ५५३ कोटी १४ लाख इतकी झाली आहे . तसेच संस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांशा बरोबरच दिपावलीनिमित्त ५ लिटर खाद्य तेल देण्याची घोषणा चेअरमन उदय शहा यांनी केली .
चेअरमन शहा यांनी संस्थेकडे अहवाल सालात ठेवी ७८ कोटी ५ लाख, कर्ज वितरण – ६२ कोटी ४३ लाख रू . चे केले आहे . तर गुंतवणूक – २५ कोटी २८ लाख ची केली आहे . संस्थेला निव्वळ नफा -२ कोटी १ लाख इतका झाला असुन मुरगूड परिसरातील संस्थामध्ये सर्वाधिक आहे . संस्थेचा एकूण व्यवहार – ५५३ कोटी १४ लाख असून, थकबाकी ०.२७ टक्के तर ऑडीट वर्ग ‘अ’ (मार्च २०२१) मिळाला आहे .
यावेळी इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंतांचा तसेच राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त भारत तांबेकर , डॉ. दत्तात्रय कदम व प्रकाश तिराळे यांचा सत्कार करण्यात आला. याबरोबरच उत्कृष्ट कामगिरी बद्दल कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.
अहवाल वाचन संस्थेचे कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांनी केले.सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी सविस्तर व तपशिलवार उत्तरे दिली . सभेत नामदेवराव मेंडके यांनी संस्थेला ‘आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाल्याबद्दल संचालकां च्या अभिनंदनाचा मांडलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यावेळी डॉ . शिवाजी होडगे , डॉ दत्ता कदम, भारत तांबेकर, बाळकृष्ण खामकर यांनी आपली मनोगते व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या. सभेत सभासद परशराम डोणे, मधुकर भोसले, अशोक डवरी, बाबुराव पाटील, महादेव कोळी दत्तात्रय मगदुम यांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला
यावेळी व्हॉईस चेअरमन प्रकाश हावळ, सर्व संचालक , सर्व शाखाधिकारी , सेवक वर्गासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते . संचालिका अॅड सौ.रेखा भोसले यांनी स्वागत केले. सुत्रसंचालन सात्ताप्पा चौगले यांनी केले . तर आभार संचालक सोमनाथ यरनाळकर यांनी मानले.