ताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ बाबासाहेबांच्या विचारातील नागरिक घडणे महत्त्वाचे- प्रा.डॉ.ए.आर.माने

गारगोटी प्रतिनिधी : 

श्री मौनी विद्यापीठ संचलित, आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी व भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दूध साखर महाविद्यालयातील प्रा.डॉ.ए. आर. माने हे बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्रा.डॉ.पी.बी.दराडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. माने म्हणाले,डॉ. आंबेडकर हे विज्ञानवादी महामानव होते हे आपण समजून घेतले पाहिजेत. देशाच्या संविधानाला ज्या व्यक्तीने जन्म दिला आणि ज्या व्यक्तीमुळे आज भारत देशाचा संपूर्ण कारभार चालतो अशी व्यक्ती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचे कार्य स्त्रियांसाठी ही मोलाची आहेच, त्याचबरोबर त्यांचा लढा हा कामगार वर्गासाठी मोलाचा आहे. बाबासाहेब हे समजून घेताना त्यांना त्यांच्या संदर्भ साधनांमध्ये प्रत्येक व्यक्तीने शोधावे असे मत आज डॉ.ए.आर. माने यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पी.एस. देसाई, डॉ.आर.के.शेळके, प्रा.सौ. डॉ.एम. एन. मोरे, , प्रा.सौ. एस. आर. बाड ह्या उपस्थित होते.
प्राध्यापक मनोगतामध्ये महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आर. के.शेळके यांनी बाबासाहेबांचे शैक्षणिक विचार मांडले. शिक्षणामुळेच आपल्या जगण्यात आमूलाग्र बदल होऊ शकतो.हे त्यांनी जाणलं होतं बाबासाहेबांच्या शिक्षण विषयक दृष्टिकोन किती प्रगल्भ आणि आधुनिक होता हे सांगत महाविद्यालयाच्या होणाऱ्या भावी शिक्षकांनी हे बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे असे मत त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मांडले.
प्रशिक्षणार्थी मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या छात्र प्रशिक्षणार्थी सोनाली लोकरे, अश्विनी सारंग, सोनाली कपले, रूपाली चौगुले, अश्विनी जेधे व अनिल वारके यांनी बाबासाहेबांची शैक्षणिक विचार ,राजकीय विचार, सामाजिक विचार व त्यांच्या जीवनावरील प्रसंग आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. पी.बी.दराडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षण विषयाच्या संकल्पना मांडल्या, बाबासाहेबांना अपेक्षित असणारे शिक्षणाचे महत्त्व सांगत असताना, आपण शिक्षणशास्त्रा बरोबरच आपल्या जीवनामध्ये सामाजिक शिक्षणाचाही अवलंब केला पाहिजे. तरच बाबासाहेबांचे विचार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार आजच्या पिढीमध्ये आत्मसात होईल असे मत त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये केले.
हा कार्यक्रम आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी व भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने व महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. एम. एन. मोरे व प्रा. एस. आर. बाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाच्या छात्र प्रशिक्षणार्थी स्नेहल देसाई यांनी केले, तर प्रास्ताविक शिवाजी गावडे यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो पूजन व भित्तीपत्रिका उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष ,प्रमुख पाहुणे व प्राध्यापक वृंद यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या छात्र प्रशिक्षणार्थी कृष्णात कांबळे ,धनश्री पाटील, अतुल चौगुले ,रणजित मोरे, प्राजक्ता देसाई व अरंकाज लोबो यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर पथनाट्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे महत्त्व समर्पक प्रसंगातून सादर केला. तसेच प्रशिक्षणार्थी कृष्णात कांबळे व प्राजक्ता देसाई यांनी आवेशपूर्ण भीम गीत सादर करत बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन भाषा मंडळाने केले.या कार्यक्रमासाठी प्रेरणा महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री मौनी विद्यापीठाचे संचालक डॉ. आर. डी. बेलेकर यांची मिळाली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच बी.एड. द्वितीय वर्षाचे छात्र प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता दिग्विजय हळदकर यांनी आभार मानून केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks