ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राधानगरी : जेनेसीस महाविद्यालयाच्या परिसरात आढळला दुर्मिळ खपरखावल्या प्रजातीचा साप

राधानगरी प्रतिनिधी :
जेनेसीस महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळ प्राणिशास्त्र विभागाचे राहुल कांबळे व विजय जाधव यांना पूर्ण वाढ झालेला खापर खवल्या जातीचा बिनविषारी साप आढळून आला.
भौगोलिक आणि जैविक संरचनेनुसार खापर खवल्या (शिल्ड टेल)(uropeltis phipsonii) जातीचा बिनविषारी साप हा थंड हवेच्या ठिकाणी आढळत असतो, अशा प्रजातीच्या सापाच्या अधिवासामुळे राधानगरीचे जैविक वैविध्य संतुलित आहे याची सकारात्मक जाणीव होत असल्याचे प्रा. राहुल कांबळे व्यक्त यांनी केली.
सध्या राधानगरी परिसरात थंड हवा असल्यामुळे खपरखावल्या प्रजातीचे साप रोड वर येऊ लागले आहेत, तसेच राधानगरी घाट परिसरात वाहन चालवताना सापांची हत्या होणार नाही याची काळजी घ्यावी असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य शोभराज माळवी यांनी मांडली…
खपरखावल्या सापाला सुरक्षित जंगल परिसरात सोडून देण्यात आले.