नेसरी येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

नेसरी प्रतिनिधी : अंकिता धनके
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सात मे रोजी मतदान होणार आहे या अनुषंगाने नेसरी व अर्जुन वाडी येथे पोलीस विभागामार्फत पथसंचालन करण्यात आले.
या पथसंचलनात नेसरी पोलीस ठाणे कडील सपोनी आबा गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसएफ कडील इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर सह 50 अंमलदार नेसरी पोलीस ठाणे कडील 10 पोलीस अंमलदार 12 होमगार्ड पोलीस मुख्यालय कडील पीएसआय शहर वाहतूक शाखेतील एक अंमलदार इत्यादी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.
रूट मार्च सरसेनापती प्रतापराव गुजर चौक येथून सुरुवात होऊन पिंपळकट्टा, मुख्य बाजारपेठ, मराठी शाळा, बँक ऑफ इंडिया मार्गे हा रूट मार्च बस स्थानक परिसरात आला त्यानंतर अर्जुनवाडी येथेही मुख्य रस्त्यावरून ग्रामपंचायत चौक, नाईक गल्ली या ठिकाणी रूट मार्च काढण्यात आला.