सोहाळेतील समता ग्रुपच्यावतीने गुणवंतांचा गौरव व पारितोषिक वितरण उत्साहात

आजरा, प्रतिनिधी :
सोहाळे (ता. आजरा) येथील समता ग्रुपच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला.
स्वागत मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कोंडूसकर यांनी करुन प्रास्ताविकात मंडळाच्यावतीने गेली २५ वर्षे राबविले जाणारे विविध उपक्रम व कार्यक्रमांची माहिती दिली. गणेशमुर्ती देणगीदार महेश नेवरेकर, महाप्रसाद देणगीदार धनाजी डेळेकर, बाळासाहेब ग. दोरुगडे, मयुर डेळेकर, हसन मुश्रीफ फौंडेशन कागल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जि. प. चा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. मारुती डेळेकर, जि. प. चा आचार्य अत्रे उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळाचे सचिव सचिन कळेकर, परीमंडळ वनअधिकारीपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल कृष्णा डेळेकर यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध मार्गदर्शक शिक्षिका सौ. प्रज्ञा राजदीप, सौ. लता चौगुले, नागेश सुतार यांच्यासह उत्तम तुरंबेकर यांचाही सत्कार करण्यात आला.
मंडळाच्यावतीने देण्याता येणारा सन 2022 चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार वैष्णवी विजय देसाई व निखिल रमेश सावेकर यांना तर उत्कृष्ठ स्वयंसेवक पुरस्कार नामदेव आप्पा दोरुगडे यांना देवून गौरविण्यात आले. होतकरु व गरजू विद्यार्थी म्हणून निशांत जयवंत कांबळे व समिक्षा सुनील भोईटे यांना शैक्षणिक मदत करण्यात आली. विविध शालेय परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांसह गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना शिक्षक नागेश सुतार यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमास आण्णासो पाटील, तुकाराम देसाई, बाबुराव दोरुगडे, मारुती कोंडूसकर, तलाठी महादेव देसाई, सदाशिव डेळेकर, तानाजी कांबळे, सरपंच सौ. वृषाली कोंडूसकर, उपसरपंच राजेंद्र दोरुगडे, ग्रा. पं. सदस्य मनिषा पाटील, श्रीमंता गुरव, तानाजी पोवार, रमेश कांबळे, रविंद्र दोरुगडे, माया कोंडूसकर, निशा देसाई, मधुकर डेळेकर, मंडळाचे सचिव सचिव कळेकर, खजिनदार उत्तम डेळेकर, महेश नेवरेकर, संदीप देसाई, निखिल कळेकर, नामदेव दोरुगडे, किशोर पोतदार, आनंदा पोवार, शिवाजी कोंडूसकर, विलास कोंडूसकर, धनाजी गाडे यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार महादेव पाटील यांनी मानले