शासनाच्या योजनांचा लाभ जनतेला दारात जाऊन देणार ; कागलमध्ये ई श्रम कार्ड वाटप :राजे समरजितसिंह घाटगे

कागल,प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यामध्ये शासनाच्या अनेक योजनांसाठी जनतेला नेत्यांच्या दारात जावे लागते. मात्र आपण शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला दारात जाऊन देत आहोत.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथील काळमवाडी वसाहत येथे राजे फाउंडेशनमार्फत आयोजित इ श्रम कार्ड वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या विविध योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचताना कोणत्याही मध्यस्थाची किंवा कोणत्याही लाभार्थ्यास नेत्याच्या दारात जावे लागत नाही. मात्र राज्य शासनाच्या योजनांचे लाभ घेण्यासाठी नागरिकांना नेत्यांच्या दारात जावे लागते.
यावेळी राजे बँकेचे संचालक राजेंद्र जाधव, संदीप शिंदे, महेश पाटील, महेश भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत माने, युवराज पसारे, उमेश सावंत, प्रकाश वाघमारे, बाळासो नाईक आदी उपस्थित होते.
स्वागत संतोष कोरवी यांनी केले. विशाल म्हातुगडे यांनी आभार मानले .