घरगुती गणपती सजावट स्पर्धेत अक्षय पाटील प्रथम

बिद्री प्रतिनिधी :
बेलवळे बुद्रुक ( ता. कागल ) येथील कै. मालुबाई राजाराम कुंभार संचलित गुरुमाऊली फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेत अक्षय संभाजी पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस प्रांजल प्रवीण पाटील यांनी मिळविले. अन्य विजेते – तृतीय क्रमांक : विजय मदन गिरी, चतुर्थ क्रमांक : कपील आ. पाटील, पाचवा क्रमांक : नामदेव पाटील.
स्पर्धेतील विजेत्यांना जि. प. सदस्य मनोज फराकटे, सरपंच रोहिणी पाटील, उपसरपंच विठ्ठल पाटील, शाळा व्य.स. अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष नीता पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल कुंभार, सचिव स्वाती कुंभार यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण अविनाश तराळ, विश्वनाथ डफळे, सहदेव पाटील यांनी केले.
स्पर्धा पार पडण्यासाठी अशोक कुंभार, संदीप कुंभार, संजय कुंभार, अमोल कुंभार, लता कुंभार, राजश्री कुंभार, अनिता कुंभार, अतुल कुंभार, यश कुंभार, विजय पाटील, दस्तगीर फकीर, बाळासाहेब देशमुख, कृष्णात बारड, प्रदीप जाधव आदींचे सहकार्य लाभले. आभार संतोष पाटील यांनी मानले.