ताज्या बातम्या
मुकेश सारवान यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा

विशेष प्रतिनिधी:
लोकसभा कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघाचे उमेदवार खा.संजय मंडलिक व खा.धैयशिल माने यांच्या प्रचारासाठी शिवसेना प्रणित – मेहतर, रूखी, वाल्मिकी (स्वतंत्र) विभाग राज्य समन्वयक मुकेश सारवान व राज्य उपाध्यक्ष सुरेश तामोत हे १ मे रोजी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या नेतृत्वांतील उपेक्षित दलित सामाजिक परिषद, शिवराज्य सफाई कर्मचारी सेना, मेहतर रूखी वाल्मिकी (स्वतंत्र) विभाग संघटनेचे जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व शहर अध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते,समाज बांधव यांचे सोबत बैठक घेऊन खा.संजय मंडलिक आणि खा.धैर्यशिल माने यांना प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत असे जिल्हा समन्वयक श्रीधर पंडत यांनी कळविले आहे.