कागलमधील परिवर्तनासाठी राजे गटाच्या जुन्या मंडळींनी एकत्र यावे :राजे समरजितसिंह घाटगे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यात परिवर्तन घडवण्यासाठी राजे गटाच्या जुन्या मंडळींनी एकत्र यावे. असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
व्हनाळी ता.कागल येथे बांधकाम कामगारांना साहित्य वाटप व गुणवंताचा सत्कार कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
श्री.घाटगे पूढे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात आमच्याकडे कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना कोणीही कार्यकर्ते गट सोडून गेले नाहीत. मात्र कालच राजे गटाचे जुने कार्यकर्ते असलेले नगराध्यक्षा सौ. माणिक माळी व रमेश माळी यांनी राजे गटात प्रवेश केला. हा आम्ही प्रवेश मानत नाही.जुनी मंडळी पुन्हा आपल्या गटात परत आली आहेत. त्यामुळे राजे गटाच्या इतर जुन्या मंडळींनीही राजे गट मजबूत करून कागलमध्ये शाश्वत व सर्वांगीण विकास करण्यासाठी राजे गटात एकत्र यावे.
यावेळी नामदेव बल्लाळ, शामराव बल्लाळ, बाजीराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर शाहूचे संचालक प्रा सुनील मगदूम, भाऊसाहेब कांबळे,माजी संचालक आर के पाटील, संजय पाटील, प्रताप पाटील,धैर्यशील इंगळे संभाजी जाधव, गोरखनाथ वाडकर, एन.डी.वाडकर, मारुती कुळवमोडे, वाय .व्ही.पाटील, संतोष गायकवाड,रामचंद्र वैराट,प्रकाश सुळगावे आदी उपस्थित होते.
स्वागत शाहू कृषी संघाचे संचालक दिनकर वाडकर यांनी केले. आभार दत्तात्रय कुळवमोडे यांनी मानले.
मंत्र्यांचा भुलभुलय्या……..
शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर येताच गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीमुळे प्रलंबित असलेले शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान पुढच्या आठवड्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेली अडीच वर्षे कागलच्या मंत्र्यांनी हे अनुदान देण्याच्या फक्त घोषणा केल्या.अनुदान मिळायच्या आधीच त्यांनी अभिनंदनचे बोर्ड गावोगावी दोन-दोन वेळा लावले. मात्र राजे समरजितसिंह घाटगे यांनी या अनुदानासाठी मोर्चा, आंदोलने,निवेदने, उपोषण केले.मंत्र्यांच्या भुलभुलय्या ऐवजी राजेंनी केलेल्या पाठपुरावाला यश येऊन या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे.असा टोला मंत्री मुश्रीफ यांना शामराव बल्लाळ यांनी नाव न घेता लावला.