ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापुर : राजारामपुरी येथे दुसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा जागीच मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी :
कोल्हापूर येथील राजारामपुरी येथे दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून पडून महिलेचा जागीच मृत्यू झाला. शोभा कांबळे (वय २७, रा.राजारामपुरी) असे महिलेचे नाव आहे. राजारामपुरी अकरावी गल्ली येथील जितकर कॉम्प्लेक्स मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून पडून महिलेचा मृत्यू झाला.
आज (मंगळवारी) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. प्रथम दर्शनी हा प्रकार संशयास्पद असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे, भगवान शिंदे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे. मध्यवर्ती चौकात हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली.